President's Message

आपल्या उपनिषदांमध्ये एक अतिशय प्रेरणादायक वाक्य आहे,
उत्तिष्ठत: जागृत प्राप्य वराननिबोधत: म्हणजेच "जागे व्हा, उठा, लक्ष्य प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका".
मुलांनो आपले लक्ष्य (ध्येय) निश्चित करा आणि आजपासून ह्या वाटेवर वाटचाल सुरू करा. ध्येयमार्ग हा कितीही कठीण असला तरी तो सोडू नका. नदी पर्वतावरून समुद्राला भेटण्यासाठी निघते, मग वाटेत येणारे सर्व अडथळे मोडून काढून ओलांडून वळसा घालून पार करते, समुद्राला जाऊन भेटतच. आपणही तसेच येणाऱ्या अडथळ्यांना योग्य पध्द्तीने पार करुन ध्येय गाठलेच पाहिजे.